नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार, पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून, अशा दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांची सद्यस्थिती, नुकसानीची व्याप्ती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी बंडू कापसे, तहसीलदार संतोष ढेरे आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना पालकमंत्री म्हणाले, दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी दिली.

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासन तुमच्या पाठीशी आहे. आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

दोन दिवसात 5 हजार अग्रीम जमा होणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी देताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, येत्या एक-दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा करण्यात येणार आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!