महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे अरबी समुद्रातील स्मारक उभे राहवे असे स्वप्न अनेक वर्षांपासून शि वप्रेमींचे आहे शिवरायांचा आदर्श जगाने व तरुण पिढीने घ्यावा यासाठी शिवस्मारक प्रेरणादायी ठरु शकते त्यामुळे सरकारने यामध्ये त्वरित लक्ष घालून अरबी समुद्रातील शिवस्मारक बाबतीत निर्णय घेवून शिवप्रेमींचे स्वप्न पुर्ण करावे असे मत राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी केली आहे.


वैराग जिल्हा सोलापूर येथे राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचा मेळावा शिवजयंती निमित्त नुकताच पार पडला त्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील बोलत होते कार्यक्रम अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील होते यावेळी राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य भुषण एम के बीएन आर सागर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, आदिंची भाषणे झाली
या मेळाव्यास राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे राज्य निरीक्षक भानुदास वाबळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील, युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष अनिता ताई पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे, दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे,पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा अलका ताई सोनवणे, सीताताई जाधव, अनिल बागल, संपर्क प्रमुख ओंकार निंबाळकर, शोभना मानकर, वर्षा अंधारे, मंजुषा डोईफोडे, दत्तात्रय देठे, काकासाहेब पवार, प्रकाश शिर्के,हरिष शिंदे, आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ व दर्या बाई निंबाळकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ भुषण, मराठा भुषण पुरस्कार वितरण राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!