जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे जळगाव येथे जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात समाज बांधवांशी संवाद साधत समाजाच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना समाजरत्न, उद्योगरत्न व समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नैपुण्य मिळविणाऱ्या ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ (परभणी), नाशिक येथील सूर्या ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंदराव सूर्यवंशी, विजय मिस्तरी (पारोळा), सुभाष वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शहराध्यक्ष प्रशांत राऊत, युवा शहराध्यक्ष निलेश खैरनार, शहर सचिव सुरेश जाधव, रवींद्र जंजाळकर, मनोज जाधव, सागर जाधव, वैभव दांडेकर, धनराज रुले यांच्यासह जिल्हाभरातून आलेले विश्वकर्मा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजातील एकता आणि गुणवंतांचा सन्मान हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!