(नवी मुंबई) जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाशी संबंधित भरलेले फॉर्म क्रमांक ७ च्या तब्बल २० हजार प्रती नवी मुंबई येथील APMC मार्केटमधील एका झेरॉक्स सेंटरवर झेरॉक्स करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका विधानसभा मतदारसंघाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर भरलेले फॉर्म क्रमांक ७ नवी मुंबईत मिळत असतील, तर यामागे मोठे गौडबंगाल असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार मतदार याद्यांशी छेडछाड करण्याचा तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले. सदर घटनेची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या निवेदनाची दखल घेत बातमी येताच या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, प्रकरणाचा संपूर्ण छडा लावून सत्य समोर आणले जाईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिले.
यावेळी माझ्यासमवेत शहर सचिव विलास घोणे, विभाग अध्यक्ष विकास पाटील आदी उपस्थित होते.
