अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.

देवलाली प्रवरा / राहुरी फॅक्टरी, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने देवलाली प्रवरा नगरपरिषदेच्या राहुरी फॅक्टरी येथील योगाभवन येथे मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार चंद्रशेखर भाऊ कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दंत तपासणी करून घेतली.

यावेळी मान्यवरांची उपस्थिती:

या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष गोरख काका मुसमाडे, माजी नगराध्यक्ष मुरली आबा कदम, मच्छिंद्र पाटील कदम, नगरसेवक वसंत पाटील कदम, नगरसेवक वैभव गाडे, नगरसेवक शरद खांदे, तसेच वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. युवकांनी अशा आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची दंत तपासणी करून मोफत सल्ला व औषधोपचार दिले. या शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!