श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती निमित्त आज दिनांक. 12.2.2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता संत रोहिदास विद्यामंदिर सुभाष नगर येथे फोटो पूजन करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवतेज माहिती अधिकार,पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटना जिल्हा अध्यक्ष श्री. शिवाजीराव गिरी गोसावी यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षक स्टाफ व रोखठोक दैनिकाचे प्रतिनिधी अशोक शेटे, पत्रकार प्रदीप जाधव व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी सर्वांनी संत रोहिदासांना अभिवादन केले.
