नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जितु जयस्वाल

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे बाल आनंद मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाविषयी माहिती देण्यात आली. बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन खांडबारा गावाचे लोकनियुक्त सरपंच अविनाश गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी एकूण 20 स्टोल लावले होते. यावेळी खिचडी, खमण, पाणीपुरी, पोहे, भजी, गुलाब जामून, उपमा, इडली, उसळ, पास्ता, बिर्याणी, पोंगे बटाटे, पापड, पाववडे, बॉईल अंडे अश्या विविध खाद्यपदार्थ खवैय्यांसाठी मांडण्यात आले होते.

यावेळी शालेय परिसराची सजावट करण्यात आली होती. बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व पालक यांनी बनविलेल्या पदार्थांचा स्वाद घेतला.बाल आनंद मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जि प मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना वळवी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पाडवी तसेच सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!