कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.

शिवाजी तरुण मंडळातर्फे भव्य मिरवणूकीने शिवजयंती उत्सव साजरा. शिवाजी पेठ येथील शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत महाराजांचा अश्वारूढ पुतळा सहभागी करण्यात आला होता मिरवणुकीत महिला , तरुणांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. छ.शिवाजी महाराज यांच्या वेशभूषातील लहान मुले व मुलींचे लेझीम पथक , जेष्ठ नागरिक यांचे भजनी मंडळ, आकर्षक लाईट व डॉल्बीच्या तालावर नाचणारे तरुणांची अलोट गर्दी होती. शिवाजी तरुण मंडळान तर्फे मिरवणूकीसाठी खास कालिचरण महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते, कालिचरण महाराज यांनी मिरवणुकीत जमलेल्या लोकांना हिंदू धर्म रक्षणाचे व शिस्तबद्ध मिरवणूकीचे आवाहन केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!