जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन
जळगाव, बारामती, मुंबई येथे कार्यक्षेत्र असलेल्या सामाजिक संस्था एल. ओ.एस.फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या उपक्रमशील गुरूंचा सन्मान व समाजातील गरजू होतकरू विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप जळगाव म.न.पा.चे महापौर सौ.दीपमाला काळे, आमदार श्री.राजुमामा भोळे, चर्मकार विकास संघाचे उपाध्यक्ष श्री.विश्वनाथ सावकारे, उपमुख्याध्यापक श्री.संजय वानखेडे सर, सरपंच श्री.राजेश वाडेकर सर, श्री.प्रकाश रोजतकर, श्री.कमलाकर ठोसर, श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दिवाकर जोशी, संचालक श्री. भगवान लाडवंजारी, एल. ओ. एस.फाउंडेशन चे अध्यक्ष श्री सुजल सावकारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीस व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले गुरुजण तथा उपक्रमशील उपमुख्याध्यापक श्री.संजय वानखेडे सर, प्रयोगशील, संवेदनशील, आदर्श शिक्षिका सौ.उज्वला वाडेकर मॅडम, शिक्षक संघटनेच्या उपक्रमशील पदाधिकारी प्रा.सौ.स्मिता जयकर, आदर्श सरपंच तथा आदर्श शिक्षक श्री.राजेश वाडेकर सर, उपक्रमशील, उत्साही मुख्याध्यापक श्री.संदीप ठोसर, प्रयोगशील शिक्षिका सौ.राजश्री तायडे या गुरुजनांचा सत्कार प्रमुख अतिथी आमदार श्री राजू मामा भोळे, महापौर सौ.दीपमाला काळे यांच्या हस्ते सन्मानपत्र, पुषगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच समाजातील गरजू, होतकरू 40 विद्यार्थाना रायटिंग पॅड, कंपास सेट आदी शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा उपक्रमशील उपमुख्याध्यापक श्री संजय वानखेडे यांनी सन्मानित केल्याबद्दल ऋण व्यक्त करून एल. ओ.एस.फाउंडेशन च्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करून उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच आदर्श शिक्षिका सौ. उज्वला वाडेकर मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थांचे कौतुक करून विद्यार्थांनी जिद्द, चिकाटीने अभ्यास करून जीवनात चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी तथा महापौर सौ.दीपमाला काळे यांनी सर्व सन्मानित गुरुजनांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून शिक्षक हा राष्ट्रनिर्माता असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे तसेच पर्यावरण संरक्षण करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रतिभा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री सुजल सावकारे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.सविता ठोसर, सुजल सावकारे, योगेश भारंबे, भाग्यश्री राणे, हेमंत चव्हाण, चेतन सोनवणे, निखिल गांगुर्डे, आदित्य मोंढकार, सक्षम गुरव, तसेच श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.
