धुळे जिल्हा प्रतिनिधी – प्रमोद बोरसे.
अजंदे बुद्रुक : बेटावद जिल्हा परिषद गटातील मौजे अजंदे बुद्रुक येथे तरुण युवा वर्गाला मैदानी खेळांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी खेळपट्टी तयार करण्याच्या उपक्रमाला भाजपाचे युवा नेते तथा नामदार भाऊसो जयकुमार रावल यांचे नम्र शिपाई दादासाहेब महेश पाटील यांनी सहकार्य केले.
या सहकार्याबद्दल अजंदे बुद्रुक येथील युवा ब्रिगेडच्या वतीने दादासाहेब महेश पाटील यांना खेळपट्टीवर विशेष आमंत्रित करण्यात आले. यावेळी युवा वर्गाने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त सत्कार केला.
यावेळी दादासाहेब पवन कोळी, अनिकेत शिरसाट, जितेंद्र कोळी, भूषण कोळी, दादासाहेब निकम, परदेशी यांच्यासह बेटावद येथील माजी उपसरपंच आप्पासो गणेश माळी, राजेंद्र खलाणे, प्रतीक खलाणे, पाष्टे येथील विनोद पाटील, पडावद येथील भैय्यासो तुषार जाधव, राजेंद्र अहिरे, अशोक अण्णा पवार तसेच अजंदे बुद्रुक येथील मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.
मैदानी खेळांना प्रोत्साहन देत युवा पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल उपस्थित युवा वर्गाने दादासाहेब महेश पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. खेळपट्टी उपलब्ध झाल्याने परिसरातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात या मैदानावर विविध मैदानी खेळांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
