सोलापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐतिहासिक निर्णय; लेखा संवर्गातील प्रलंबित प्रश्नांवर राज्यव्यापी चर्चा

सोलापूर प्रतिनिधी.

जिल्हा परिषद कर्मचारी लेखा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर येथील शिवशंकर मंगल कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडली. संघटनेचे अध्यक्ष मिलिंद दादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत महाराष्ट्र राज्यातील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर राज्यव्यापी चर्चा करण्यात आली.

या सभेतील महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे लेखा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. पवन तलवारे यांची महाराष्ट्र राज्य लेखा संवर्गाच्या राज्य कार्याध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे लेखा संवर्गातील कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सभेदरम्यान लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक अडचणी, प्रलंबित मागण्या तसेच संघटनेच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे शासन दरबारी मांडण्याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी मिलिंद दादा कांबळे, संजय महाळकर, चंद्रकांत फसाले, प्रशांत सुतार, पवन तलवारे, आनंद जाधव, प्रकाश शेंडगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सोलापूर लेखा संवर्गातील कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.

निवडीनंतर अभिनंदनाचा वर्षाव

पवन तलवारे यांची राज्य कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार)च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड, सय्यद मिन्हाज, देवेंद्र देशपांडे, संतोष मठपती, धनंजय गुम्मलवार, राघवेंद्र मदणुरकर, सचिन चौंदते, छाया कांबळे, इंदुमती वाघमारे, उज्वला गजभारे, सविता शिंपाळे, राजश्री इपते आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

गणेश अंबेकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) महाराष्ट्र राज्य तथा मराठवाडा संघटक, राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य माजी राज्याध्यक्ष आणि ऑल इंडिया गव्हमेंट्स कॉन्फेडरेशन ड्रायव्हर युनियन, नवी दिल्लीचे माजी उपाध्यक्ष यांनीही पवन तलवारे यांचे अभिनंदन केले.

पवन तलवारे यांच्या नेतृत्वाखाली लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!