स्वच्छता अभियानासह कबड्डी स्पर्धांचे आयोजन 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

रावेर : सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. क्रीडा दिनानिमित्त शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती ए. व्ही. महाजन मॅडम होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते क्रीडा शिक्षक श्री. वाय. पी. महाजन सर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जीवनप्रवासावर तसेच क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय मनोगतात श्रीमती ए. व्ही. महाजन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात खेळाचे महत्त्व स्पष्ट केले. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रजी मिसर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्रजी आठवले, संचालक तुषारजी मानकर, मुख्याध्यापक श्री. बी. आर. महाजन, उपमुख्याध्यापक श्री. एन. जे. पाटील, उपप्राचार्य श्री. एस. आर. राणे, पर्यवेक्षक श्री. जी. टी. पाटील, क्रीडा शिक्षक श्री. जे. के. पाटील व श्री. वाय. पी. महाजन, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभागी होत स्वच्छतेचा संदेश दिला.

तसेच क्रीडा दिनानिमित्त क्रीडा शिक्षक श्री. जे. के. पाटील सर व श्री. वाय. पी. महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. एन.व्ही.चौधरी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समिती प्रमुख सौ. एन. व्ही. चौधरी मॅडम व श्री. वाय. पी. महाजन सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!