विद्यार्थ्यांनी साकारला राष्ट्रध्वजाभिमान व राष्ट्रभक्तीचा संदेश

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाभिमान देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक जाणीव, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या हेतूने जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालया तर्फे “हर घर तिरंगा ,हर मन तिरंगा ” या शासकीय उपक्रमांतर्गत देशभक्तीच्या उत्तुंग उत्साहात 300 फूट लांब”भव्य तिरंगा रॅलीचे “आयोजन करण्यात आले. या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे N.C.C. पथकातील विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी सन्मानाने व शिस्तीने ३०० फूट लांबीच्या भव्य आणि देखणा तिरंगा ध्वजाचे सादर केलेले प्रदर्शन ! या तिरंगा रॅलीमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. ‘ या प्रसंगी “भारत माता की जय”आणि “वंदे मातरम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

तिरंगा रॅलीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून देशभक्तीपर गीतांच्या निनादात झाली. रॅलीमध्ये शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्धरीत्या आणि उत्साहाने सहभाग नोंदवला. हातामध्ये सन्मानाने ३०० फुट लांब भव्य तिरंगा घेऊन शिस्तबद्ध चालणारे N.C.C .चे कॅडेट्स आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देणारे विद्यार्थी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, ज्येष्ठ पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, पर्यवेक्षक श्री. जगदीश साळुंखे, N.C.C .विभाग प्रमुख श्री. श्रीकांत घुगे आणि क्रीडा विभाग प्रमुख श्री. उल्हास ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती व विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढा तसेच स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग,बलिदान व राष्ट्रप्रेम आणि शिस्तीचे महत्त्व याबाबत माहिती दिली. N.C.C. विभाग प्रमुख श्री. श्रीकांत घुगे आणि क्रीडा प्रमुख श्री. उल्हास ठाकरे, श्री.पंकज खंडाळे, श्री.हेमंत सपकाळे यांनी रॅलीचे उत्कृष्ट नियोजन केले.

या देशभक्तीपर उपक्रमास शाळेतील शिक्षक श्री. आनंदा चौधरी, श्री आनंद पाटील, श्री. सोमनाथ महाजन, श्री.प्राजक्त प्रचंड, सौ.प्राजक्ता गोहिल, सौ.रेवती किन्हीकर, सौ.मनिषा वानखेडे, सौ.संगीता कुलकर्णी, सौ.स्मिता करे, सौ.सुनीता रोटे, श्री.योगेश सोनजे, श्री पंकज महाले, श्री प्रेम सारस्वत, श्री.सुनील अंबिकर, श्री.सरजू निंभोरकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ही “तिरंगा रॅली “अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध देशभक्तीमय वातावरणात पार पडली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!