मुंबई, दि.९, विधानसभा विशेष वृत्तांत : अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणाची महिन्याभरात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य अनिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भोसले बोलत होते. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य बालाजी काळे, हरिश पिंपळे, भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले की, कार्यकारी अभियंता, अमळनेर यांच्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य अभियंत्यांना चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमून महिनाभरात चौकशी पूर्ण करण्यात येईल.

तसेच संबंधित अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व आर्थिक गैरव्यवहारांची तपासणी करून आवश्यकतेनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात येईल. याशिवाय या प्रकरणाचा विशेष लेखापरीक्षण अहवालही मागविण्यात येणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!