मुंबई, दि. 9, विधान परिषद विशेष वृत्तांत : भंडारा येथील 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी साहित्य, उपकरणे आणि मशिनरी खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर 15 दिवसांत कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

विधान परिषदेत सदस्य अनिल परब यांनी म. वि. प. नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री आबिटकर म्हणाले की, भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत प्रशासकीय सुविधा आणि आवश्यक साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया नियमानुसार पार पडली असून, प्राप्त निविदांचे मूल्यांकन करून प्रशासकीय मान्यतेनंतर खरेदी करण्यात आली आहे.

या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता अथवा त्रुटी आढळल्यास त्याची सखोल चौकशी करून पुढील 15 दिवसांत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल; तसेच प्रशासकीय प्रक्रियेत काही उणिवा आढळल्यास, भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक सुधारात्मक उपाययोजनाही करण्यात येतील.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!