
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.
आज 🌳वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन मार्फत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाणे परिसर स्वच्छता मोहीम,सुशोभीकरण तसेच निसर्ग संपन्न करण्यासाठी 🌱वृक्षारोपण करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ ,कडुलिंब, बूच ,करंज, पडळ, करमळ, गुळ भेंडी, सप्तपर्णी , अशी झाडे लावण्यात आली.

या🌱 वृक्षारोपण कार्यक्रमावेळी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, अधिकारी, पोलीस कर्मचारी वृक्षप्रेमी संस्थेचे सदस्य, प्रिवेल ग्रुप, कसबा बावडा रणरागिणी महिला ग्रुप सदस्य आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
