
नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान.
दिनांक 16/01/2024 रोजी केंद्र शाळा धानोरा या ठिकाणी केंद्रस्तरीय वार्षिक क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये केंद्रातील एकूण सर्व जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदवला.
क्रीडा सप्ताह उद्घाटन प्रसंगी नंदुरबार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. निलेश जी पाटील साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. जयवंत जी चौरे साहेब तसेच धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बोरसे बापू यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आलेले होते. जसे की खो-खो, कबड्डी, लांब उडी, धावणे, लिंबू चमचा, पोत्याची शर्यत यामधे प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.वैयक्तिक आणि सांघिक खेळामध्ये अतिशय उस्फूर्तपणे. यासाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकानी आपल्या विद्यार्थ्यांची पंधरा-वीस दिवसापासून तयारी करून घेतलेली होती. विद्यार्थ्यांचे सुप्त गुण आवडणाऱ्या खेळ कला गोष्टी, यांना चालना मिळावा यासाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक प्रयत्नशील होते. आपल्या शाळेची टीम जिंकू अथवा हरो पण खेळातून जो आनंद मिळत आहे हे महत्वाचे मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिला. म्हणतात ना… कोणीतरी हरेल तेव्हा कोणीतरी जिंकेल.

क्रीडा सप्ताह उत्तमरित्या पार पाडण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यासाठी शिक्षकांनी वैयक्तिकरित्या निधी जमा केला. प्रत्येकाने काय करावे कोणते काम करावे याची रूपरेषा ठरवण्यात आली. मग ते पंच असो की मैदान आखायचं असो, विद्यार्थ्यांना अल्पोहार नियोजन असो सर्वच शिक्षक हिरारीने भाग घेत होते. विशेष या स्पर्धेमध्ये सर्व शिक्षकांनी ड्रेस कोड परिधान केलेला होता. महिला शिक्षकांनी देखील याच्यात स्फूर्तीने सहभाग घेतला होता.पांढरा टीशर्ट आणि पांढरा कुर्ता असे.

स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना ट्रॉफी काही शिक्षकांनी स्वखुशीने स्मृति पित्यर्थ म्हणून स्वत:हा बक्षीस दिले.काहींनी गोड पदार्थ आणून दिले.
क्रीडा स्पर्धेचे समारोपासाठी पंचायत समितीचे सर्व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच स्पूर्ती बघायला मिळाली. साहेबांनी विद्यार्थ्यांना अनमोल असा संदेश ही दिला… हरलो म्हणजे खेळायचं संपत नाही, पुढच्या वर्षी अधिकाधिक सराव करून पुन्हा सुरुवात करू… असा संकल्प केला.

– अशाप्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात धानोरा केंद्राचे क्रीडा सप्ताह सर्वांचे सहकार्याने, आनंदाने,उत्साहाने,संपन्न झाले.
