जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

एएसपी पथकाने नजीकपांगरी, रोहणवाडी शिवारात वाळू साठ्यावर कारवाई केली.

अवैध वाळू साठवणुक विरोधात अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या पथकाने गुरुवारी एकाच दिवसात तीन ठिकाणी कारवाया केल्या. यात खादगाव, नजीक पांगरी, रोहणवाडी शिवारात धडक कारवाई करून जवळपास ३५० ब्रास अवैध साठा जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबिरसिंग सिंह यांच्या मार्गदर शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्यासह स्नेहा करेवाड, रवी देशमाने, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजीत वायको, संग्राम ठाकुर यांनी पार पाडली आहे. गुरुवारी सकाळपासूनच साळी यांचे पथक कारवाया सुरू केल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर शनाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे अवैध वाळू साठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अवैध उत्खनन व साठवणुकीवर आळा बसण्यास मदत होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!