जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

आज शिरसोली रस्ता ते एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित १०० फुटी रस्त्याबाबत संबंधित शेतकरी व जमीन मालकांसोबत सकारात्मक आणि फलदायी बैठक संपन्न झाली.

जळगाव शहराच्या भविष्यातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर एमआयडीसी, औद्योगिक क्षेत्र आणि शहरातील प्रमुख भाग यांच्यातील संपर्क अधिक वेगवान होईल. तसेच इच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली आणि इतर प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

हा केवळ रस्ता नसून जळगावच्या आधुनिक विकासाचा पाया आहे. या प्रकल्पात १०० फुटी मुख्य रस्ता, स्वतंत्र सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, दुतर्फा वृक्षारोपण, आकर्षक लँडस्केपिंग आणि पर्यावरणपूरक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा परिसर भविष्यात जळगावच्या सर्वात सुंदर आणि नियोजित विकास मार्गांपैकी एक म्हणून ओळखला जाईल.

माझ्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून, शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल सर्व शेतकरी व जमीन मालकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित जमीन मालकांना टी.डी.आर. (Transferable Development Rights) देण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येईल.

जळगावचा विकास, नागरिकांची सुविधा आणि भविष्यातील नियोजन यांना केंद्रस्थानी ठेवून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

🌳🚴‍♂️🏃‍♀️ रस्ता फक्त वाहतुकीसाठी नाही, तर शहराच्या प्रगतीचा महामार्ग असतो! — सौ. दीपमाला मनोज काळे

महापौर, जळगाव शहर महानगरपालिका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!