जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील.

पाचोरा पोलिसांनी उत्कृष्ट तपासकौशल्य व सतर्कता दाखवत राजस्थान राज्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

राजस्थान राज्यातील अजमेर येथे अंमली पदार्थ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी गोविंद शंभूनाथ (वय २७, रा. बंका खेडा, ता. कोलली, जि. भिलवाडा, राजस्थान) हा पाचोरा शहरात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, सफौ. विलास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील व गणेश कुंवर यांनी शिताफीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सदर आरोपीविरुद्ध राजस्थानमधील अजमेर व चित्तोडगड पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा पोलिसांच्या या कारवाईचे राजस्थान पोलीस दल तसेच स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत असून, बाहेरील राज्यातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची सतर्कता आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!