जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जामनेर.

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री , जामनेर तालुक्याचे लाडके आमदार व जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ आदरणीय ना. श्री गिरिषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेशदादा जैन औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात दि १६/०५/२०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात एकूण २२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजोपयोगी कार्यास हातभार लावला.

सदरील कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर या प्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे सचिव जितेंद्र रमेश पाटील संचालक चंद्रकांतजी देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सर्व विदयार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. आर डी. शिंपी सर तर समन्वयक म्हणून प्रा. आर .बी चव्हाण सर यांनी जबाबदारी पार पाडली.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मनोज बारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी योग्य ते परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!