
राहुरी फॅक्टरी शंकर कवाने.
राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या पवार यांच्या एचपी पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक पेट घेतल्याने एकच पळापळ सुरू झाली शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
राहुरी फॅक्टरी येथील पवार पेट्रोल पंप येथून शुक्रवारी रात्री इंडिगो कार डिझेल टाकून बाहेर पडली असता सदर कारने अचानक पेट घेतला. कारला आग लागताच एकच पळापळ सुरू झाली. पेट्रोल पंप परिसरातील कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक बंबास आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. कारमधील बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जाते. कारने पेट्रोल पंप बाहेर पडल्यानंतर पेट घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

