जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. (मेहरूण):

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची सभा उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत नाईक होते. यावेळी मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक, शिक्षिका सौ. शीतल कोळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या सभेत आगामी शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी शैक्षणिक नियोजन, गुणवत्तावाढ, डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर, विद्यार्थी उपस्थिती वाढविणे तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण व परिणामकारक अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे कार्य करून शाळेचा दर्जा उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शिक्षकांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!