गोद्री (मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे)

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, वाढत्या तापमानाचा फटका आता निष्पाप जिवांना बसू लागला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोद्री येथे एका नऊ महिन्यांच्या बालीकेचा उष्माघातामुळे झोपेतच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेचा तपशील

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील सर्वच तालुक्यासह गोद्री परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. दुपारच्या वेळी उष्णतेची लाट तीव्र असते. अशाच कडाक्याच्या उन्हात घरात झोपलेल्या या नऊ महिन्यांच्या चिमुरड्याला उष्माघाताचा तीव्र झटका बसला. बराच वेळ उलटूनही बाळ हालचाल करत नसल्याचे लक्षात येताच पालकांनी पाहिले, मात्र तोपर्यंत या चिमुर्डीचा अंत झाला होता.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

जालना जिल्ह्यात उन्हाची तीव्रता पाहता प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, गोंदी येथील या घटनेने उन्हाचा तडाखा किती भयानक असू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर आभाळ कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे.

नागरिकांना आवाहन:

वाढत्या तापमानामुळे विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना उष्माघाताचा धोका जास्त असतो. कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घ्यावी.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!