सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी पुराव्यासह आरोग्य विभागाचे पितळ उघडे पाडले आहे.

रावेर (विशेष प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील जनतेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन आरोग्य उपकेंद्रे उभारली आहेत. मात्र, रावेर तालुक्यात जळगाव जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे तसेच डी पी एम पंकज शिंपी यांच्या ‘मिलीभगत’मुळे शासन निर्णयाची (GR) सर्रास पायमल्ली होत आहे. सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी पाडळे बु. ता. रावेर परिसरातील उपकेंद्रांची पोलखोल करत, नियमानुसार मिळणाऱ्या सुविधा कुठे आहेत? असा संतप्त सवाल प्रशासनाला विचारला आहे.
काय सांगतो शासन निर्णय (GR) आणि प्रत्यक्ष स्थिती?
शासन निर्णयानुसार आरोग्य उपकेंद्रांमध्ये खालील बाबी अनिवार्य आहेत, परंतु रावेर तालुक्यात त्याचे चित्र भयावह आहे:

सुविधा (GR नुसार अनिवार्य) प्रत्यक्ष स्थिती (वसीम शेख यांनी मांडलेले वास्तव)
दवाखान्याची वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० (सतत २४ * ७ सेवा) अधिकारी-कर्मचारी वेळेवर हजर नसतात, नेहमीच केंद्र बंद आढळतात.
औषध साठा: किमान १०० प्रकारची अत्यावश्यक औषधे आणि प्रथमोपचार कीट. ३००० लोकसंख्येला फक्त १० पाकीट गोळ्या; औषधांचा खडखडाट.
तपासणी सुविधा: रक्त (HB), लघवी तपासणी आणि गरोदर मातांची तपासणी. सी एच ओ डॉक्टरांकडून रुग्णांना खासगी लॅबमध्ये पाठवण्यात येतो (कमिशन मिळवण्यासाठी)
पायाभूत सुविधा: वीज, पिण्याचे पाणी आणि स्वच्छ प्रसाधनगृह. भव्य इमारती आहेत, पण अंतर्गत देखभाल आणि स्वच्छतेचा अभाव.
कर्मचारी: आरोग्य सेवक/सेविकांचे मुख्यालयी वास्तव्य अनिवार्य. मुख्यालयी कुणीही राहत नाही, केवळ आशा सेविकांच्या जिवावर कारभार.”डॉ. भायेकर यांची मनमानी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव” वसीम शेख यांनी गंभीर आरोप केला आहे की, उपकेंद्रात औषधे आणि इंजेक्शनचा साठा नसतानाही डॉ. सचिन भायेकर हे कर्मचाऱ्यांना केंद्र सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकत आहेत. “साधनसामग्री नसताना कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर काय उपचार करावेत? जनतेचा रोष कर्मचाऱ्यांनी का ओढवून घ्यावा?” असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे. केवळ पोलिओ डोस आणि सरकारी आकडेवारी पूर्ण करण्यासाठी या केंद्रांचा वापर होत असून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याची मागणी
“शासनाचा पैसा औषधांवर खर्च न होता तो अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे. कंत्राटी भरतीमध्येही लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे,” असा दावा वसीम शेख यांनी केला आहे. जोपर्यंत डॉ. सचिन बाहेकर, पंकज शिंपी आणि डॉ. अमोल भंगाळे यांना पदमुक्त करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
“हे गरीबांच्या हक्काचे आरोग्य केंद्र आहे की भ्रष्टाचाराचे दुकान? इतका पैसा खाऊन कुठे नेणार आहात? जनतेच्या शापाची फळे तुम्हाला भोगावी लागतील,” अशा कडक शब्दांत वसीम शेख यांनी आपला संताप व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी पुराव्यासह आरोग्य विभागाचे पितळ उघडे पाडले आहे.
📖 नियम काय सांगतो?
✅ वेळ: सकाळी ९ ते ४.
✅ सुविधा: मोफत औषधे, रक्त-लघवी तपासणी, इंजेक्शन साठा.
❌ प्रत्यक्षात काय सुरू आहे?
३००० लोकांसाठी फक्त १० पाकीट गोळ्या!
मशिनरी असूनही तपासणी बंद!
डॉ. भाईकर आणि डॉ. भंगाळे यांची भ्रष्ट ‘जुगलबंदी’!
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या या अधिकाऱ्यांना तात्काळ पदमुक्त करा! अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी केलेली आहे.
