रावेर, जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- नूर महम्मद तडवी.

जळगाव जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा डॉ. सचिन भाईकर यांच्या भ्रष्ट नियोजनामुळे कोलमडली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी केला आहे.

आरोग्य केंद्रांमधील वास्तव:

वेळेची चोरी : ९ ते ४ ची वेळ असताना, अधिकारी १० ला येऊन १ वाजताच केंद्र बंद करतात. विचारणा केल्यास “शासनाचा आदेश” असल्याचे खोटे सांगतात.

सुविधांचा अभाव : मोफत औषधे, माता-बाल आरोग्य, लसीकरण, BP-शुगर तपासणी (NCD) आणि टेलि-कन्सलटेशन या सुविधा केवळ कागदावरच आहेत.

केवळ ‘नाटक’ : तज्ज्ञ सेवांऐवजी फक्त लसीकरणाचे आकडे भरण्यावर भर दिला जात असून रुग्णांना उपचारांसाठी वणवण करावी लागत आहे.

उपेक्षित जनता : सामान्य जनता आरोग्य संकटात असताना अधिकारी मात्र एसी (AC) केबिनमध्ये बसून आहेत.

मागणी:

आरोग्य व्यवस्था वाचवण्यासाठी डॉ. सचिन भाईकर यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तात्काळ पदमुक्त करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वसीम शेख यांनी दिला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!