जळगाव जिल्हा/मुक्ताईनगर ग्रामीण शहर प्रतिनिधी शाकीर शेख.
अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे दोन एकर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ४० ते ४५ वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी लोक वर्गणी करून ही जागा विकत घेतली होती. त्याकाळात या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झालेली आहे. संपूर्ण बिल्डिंग जीर्ण झालेली आहे. कर्मचाऱ्यांचे क्वार्टर रिकामे अवस्थेत आहेत त्याचप्रमाणे पावसाळ्यात संपूर्ण दवाखान्यात पाणी पडते, स्लॅबला गळती लागते दवाखान्याकडे जाताना रस्ता नाही, पावसाळ्यात संपूर्ण दवाखान्याच्या परिसरात चिखल होतो व चालता येत नाही, तरी पावसाळ्यापूर्वी किमान दुरुस्तीची कामे करून घेण्यात यावी. दवाखाना सुरू आहे या ठिकाणी परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात, परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी औषध निर्माता, आरोग्य सेवक, शिपाई, मलेरिया वर्कर, स्विपर व इतर जागा या ठिकाणी रिक्त आहेत. संडास बाथरूम चे दरवाजे तुटलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आहे. सर्वीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे आरोग्य केंद्र स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.

बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. गर्भवती स्त्रियांना कॅल्शियमच्या गोळ्या, खोकल्याची औषधे, लहान मुलांना औषधी इतर औषधी मिळणे कठीण झाले आहे. या ठिकाणी कर्मचारी कमी असल्यामुळे रुग्णांना पाहिजे तसा रुग्णसेवा मिळत नाही जेवढे कर्मचारी आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहे. परंतु परिसराच्या मानाने कर्मचारी कमी असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र नायगाव, सब सेंटर पातोंडी, अंतुर्ली सबसेंटर, कर्कि उपकेंद्र या ठिकाणी हीच अवस्था आहे. या ठिकाणी त्वरित ANM व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी त्याचप्रमाणे औषधांचा पुरवठा करण्यात यावा. जामनेर तालुक्यातील बेटावद येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली असताना अंतुरली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मात्र अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. दोन्ही केंद्रांना एकाच वेळी मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात असले, तरी अंतुर्ली येथील नागरिकांना मात्र जुन्या व धोकादायक इमारती आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. अंतुरली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या घानीचे साम्राज्य असून कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवत आहे. अनेक पदे वित्त असल्याने रुग्णांना योग्य सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. पूर्वी येथे गर्भवती महिलांची प्रस्तुती व शस्त्रक्रिया होत्या, मात्र सध्या त्या सेवा पूर्ण बंद आहे. त्यामुळे गर्भवती महिलांसह रुग्णांना तब्बल २५ किलोमीटर अंतरावरील मुक्ताईनगर येथे जावे लागत आहे. विशेष म्हणजे अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर १५ ते १६ खेड्यांची नागरिक अवलंबून आहेत, मात्र येथे औषधांचा सतत तूटवडा जाणवत असून आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांनी शासन वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून अंतुर्ली येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारावी रिक्त पदे भरावी तसेच पुरेशा औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी VJNT विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांनी भेट दिली असता ही अवस्था पाहायला मिळाली या सर्व बाबींकडे त्वरित लोकप्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे व समस्या सोडवण्याची मागणी केलेली आहे. जीर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत त्वरित बांधण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या भेटी प्रसंगी भ्रष्टाचार अत्याचार समितीचे अध्यक्ष शेख भैय्या शे. करीम , सामाजिक कार्यकर्ते किरण धायले, रुग्ण व नागरिक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
