जळगांव प्रतिनिधी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे, ज्येष्ठ शिक्षक श्री. ए.डी.पाटील, सौ.मंगला भारुळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सुवर्णा वंजारी यांच्या हस्ते माता सरस्वती, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्ल्यारपण करण्यात आले. या प्रसंगी इयत्ता 5 वी तुकडी “अ ” मधील विद्यार्थांनी सादर केलेल्या परिपाठात श्री.गणेश वंदना, सुविचार, दिनविशेष, बातम्या, बोधपर कथा, देशभक्तीपर, समूहगीत ,जीवशास्त्रज्ञ डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांची माहिती, भाजी व पोळीचा प्रत्यक्ष संवाद, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा यांच्या जीवनकार्याची माहिती सादर करून महत्व स्पष्ट केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांनी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक वर्गशिक्षक सौ.योगिता तडवी यांचे अभिनंदन करून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनि परिश्रम घेतले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!