जळगाव : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतची सोडत सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

त्यानंतर, महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्यात येणार आहे. या दोन्ही सभा तापी सभागृह, उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय, भुसावळ येथे पार पडणार आहेत.

या महत्वपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!