जळगाव :- जळगाव जिल्हयातील नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत शासन निर्णय क्रमांक गोखानि/10/0325/प्र.क्र.80/ख दोन दि. 23 में 2025 नुसार जळगाव जिल्हयात पर्यावरणपूरक व यांत्रिक पध्दतीने M-Sand उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची आवश्यकता लक्षात घेता खालील अटी व शर्तोंच्या अधीन राहुन M-Sand प्रकल्प उभारणीस इच्छुक उद्योजक, संस्था अथवा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक बाबी आहेत.
- प्रकल्पाचे संपूर्ण स्वरूप व उदिष्ट
- प्रकल्पासाठी सुचविलेल्या जागेचे वितरण व भू-संपत्ती बाबतचे कागदपत्र.
- पर्यावरण परवानगी व संबंधित यंत्रणाकडून आवश्यक अनुमती.
- यांत्रिक उपकरणे, प्रक्रिया व वार्षिक उत्पादन क्षमतेची माहिती.
- संस्थेची आर्थिक व तांत्रिक पात्रता दर्शविणारे कागदपत्र
- मागील संबंधित अनुभव असल्यास त्याचा तपशिल.
इतर अटी-
- शासन निर्णय दि. 23 में 2025 मधील नियम व मार्गदर्शक तत्वे लागू राहतील.
- अपूर्ण प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही.
- अंतिम निर्णयाचा अधिकार जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे राहतील.
तरी, वरीलप्रमाणे सर्व बाबींची तसेच अटींची पुर्तता करून सदर प्रस्ताव आपले तालुक्यातील तहसीलदार /उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत. असे उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
