मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रम’ या विषयावर आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, दि. 28 आणि सोमवार दि. 30, जून 2025 तसेच मंगळवार दि. 1 जुलै 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखात मंगळवार दि. 1 जुलै, 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8.00 वाजता तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन अनेक दीर्घकालीन योजना राबवत आहे. डिजिटल शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालये यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थी सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहेत. यंदा १६ जून रोजी राज्यातील सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पोषण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. यासाठी सुदृढ पोषण आहार, नियमित वैद्यकीय तपासणी, परिचारिका नियुक्ती अशा उपाययोजना ही राबविण्यात येत आहेत. या योजनांची आदिवासी विकास मंत्री श्री. वुईके यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!