जळगाव – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ जून २०२५ ते ४ जूलै २०२५ या कालावधीत जयंती पर्व साजरे करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी सीईटी परीक्षा देणारे तसेच डिप्लोमाच्या तृतीय वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी यांना अर्ज सादर करून जात पडताळणी प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. विज्ञान शाखेतील सर्व प्रवर्गांतील – अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव, विमात्र इ. – विद्यार्थ्यांची माहिती तालुका व महाविद्यालय निहाय संकलित करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रांमार्फत विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामार्फत अर्ज प्रक्रिया मार्गदर्शन दिले जाईल.

सर्व अर्ज प्राप्त केल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन समितीने केले आहे. यासाठी २६ व २७ जून, तसेच २ व ३ जुलै २०२५ या कालावधीत त्रुटी पुर्तता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!