कारंजा प्रतिनिधी.
कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार सईताई डाहाके यांनी जनता दरबार समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबार मध्ये करंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांची तात्काळ बदली करण्यासाठी विनोद नंदागवळी पत्रकार यांनी दिनांक 21 -5 -2025 रोजी स्थानिक शेतकरी भवन कारंजा येथे जनता दरबार मध्ये तक्रार विनोद नंदागवळी यांनी केली आहे, परंतु तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.
सद्ध्या लोकशाहीची गळचेपी सुरू असून वाशिम जिल्ह्यात या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम ज्या अधिकारी वर्गाकडे असते त्यांचेच दुर्लक्ष कायदा आणि सुव्यवस्था या कडे होत आहे, असे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात नेमके कायद्याचे राज्य आहे की काही निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकारी यांचे हेच मुळात कळतं नाही, यामुळे स्थानिक जनता संभ्रमात असून यातून काही कायदेशीर कारवाई करून योग्य तो न्याय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद नंदागवळी यांना मिळणार का? या वर जनमानसातून विविध विचार समोर येताना दिसत आहेत, तसेच प्रशासनाविरोधात रोष ही दिसून येत आहे. अश्याच पद्धतीने कारभार सुरू राहिल्यास भविष्यात काही चुकीचे घडू शकते, याची शंका नाकारता येत नाही.
आता पाहणे गरजेचे विनोद नंदागवळी यांनी केलेल्या तक्रारीची दखल आमदार सईताई डहाके व तहसीलदार कुणाल झाल्टे साहेब आता ह्या तक्रारीची दखल घेणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
