खांडबारा प्रतिनिधी, शरीफ बागवान

या शिक्षण परिषदेत केंद्रातील केंद्रप्रमुख मा.श्री. उदयसिंग बोरसे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जोगणी पाडा या गावातील सरपंच श्री. नितेश सुदाम वळवी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मुकेश सुरेश वळवी धानोरा केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक श्री. सुभाष बर्डे,केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक श्री. किरण घरटे व छात्रसिंग वळवी हे उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सदर शिक्षण परिषदेचा महत्त्वाचे विषय म्हणजे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) ह्या विषयी सविस्तर अशी माहिती धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. उदयसिंग जी बोरसे यांनी दिली.त्यानंतर शासन निर्णय निपून महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम याविषयी श्री गणेश कोकणी यांनी माहिती दिली. श्रीमती वाडेकर मॅडम व श्री. सूर्यवंशी सरांनी इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गाचे एकत्रित गटाचे नियोजन कसे करावे याविषयी सविस्तरची माहिती दिली.

या शिक्षण परिषदेत जि. प. शाळा जोगनीपाडाचे मुख्याध्यापिका श्रीम. सुनंदा ठाकरे व सहशिक्षिका श्रीम. नीलिमा माळी तसेच जि. प. शाळा आर्डीतारा शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश पाडवी व सहशिक्षक श्री. विदेश वसावे या सर्वांनी मिळून शिक्षण परिषदेचे नियोजन केले.

या शिक्षण परिषदेत सूत्रसंचालन श्रीम. नीलिमा माळी यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीम. सुनंदा ठाकरे यांनी केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!