दि. ८ (नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जितू जयस्वाल )

जागतिक महिला दिनाचे ८ मार्च औचित्य साधून नवापुर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय खांडबारा येथे कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार करून सुरुवात झाली. गावातील रणरागिणींचा सन्मान पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना वळवी, शिक्षिका सुनिता वळवी, अंगणवाडी सेविका फरीदा शेख, अनिता सैण्दाणे, सीमा सैण्दाणे, रेखा वसावे, भावना वसावे, लता मोरे, रत्ना पिंपळे, रेखा शर्मा, आदी माता-पालक उपस्थित होते.

फरीदा शेख यांनी आपल्या मनोगतातून सांगितले, जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन, स्त्री आहे म्हणून हे विश्व आहे. स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे. स्त्री आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात करत आहे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी वाघ यांनी केले तर आभार अविनाश गावित यांनी मानले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!