खांडबारा प्रतिनिधी शरीफ बागवान

प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.अविनाश गावित यांच्या प्रयत्नाने व जिल्हा क्षयरोग केंद्र, नंदुरबार यांच्यामार्फत टीबी संशयित रुग्णांसाठी मोफत एक्स-रे कॅम्पचे आयोजन दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते ३ वाजे पर्यंत “ग्रामपंचायत सभागृह खांडबारा ता.नवापूर जि.नंदुरबार” येथे करण्यात आले होते. तरी खालील लक्षणे असलेल्या संशयित टीबी रुग्णांनी तपासणी करून घेतली.

१.सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे
२.वजन कमी होणे,
३.भूक मंदावणे,
४.हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप,
५.छातीत दुखणे,
६.रात्री घाम येणे,
यापैकी एकही लक्षणे असल्यास एक्स-रे आणि दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!