अंतुर्ली (प्रतिनिधी किरण पाटील) – सामाजिक बांधिलकी जपत शिवाजीनगर अंतुर्ली येथील जय शिवाजी दुर्गा मंडळ व प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण २५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावले.

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. याच सामाजिक जाणीवेतून जय शिवाजी दुर्गा मंडळाने धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसोबतच सामाजिक सेवेचा वसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा स्तुत्य उपक्रम राबविला. मंडळाच्या या उपक्रमाला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली येथील वैद्यकीय पथक, डॉ. शैलेश पाटील, डॉ. सूर्यवंशी, डॉ. चौधरी, डॉ. रमेश कोळी यांच्यासह आरोग्य सेवक, आशा सेविका आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील संजीवनी ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.

या प्रसंगी भाऊराव महाजन, कैलास दुटटे, निवृत्ती दाणी, नरेंद्र दुटटे, विलास काळे, अभिनय नाईक, गजू सोनार, योगेश महाजन यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय शिवाजी दुर्गा मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!