मुंबई | स्वराज्य वार्ता लाईव्ह – राज्यात सध्या ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण असतानाच हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रात मात्र उष्णता कायम राहणार आहे.

या 9 जिल्ह्यांना अलर्ट –

हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. प्रशासनाने या जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

अरबी समुद्रातील हालचालींमुळे पाऊस –

अरबी समुद्रातील हालचालींमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई येथे हवामान कोरडे राहणार आहे.

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

1. विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका. 2. शेतातील कापणी झालेले पीक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा. 3. पुढील 2 दिवस ऑक्टोबर हीट कायम राहणार असल्याने पाणी भरपूर प्या.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!