जळगाव, दि. २० ऑक्टोबर – हर्बल लाईफमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी २४ लाख रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या सराईत आरोपीला जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. ओळख लपवण्यासाठी आरोपीने चक्क टक्कल केले होते.

पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक शक्कल –

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांकडून पैसे गोळा करून तो पसार झाला होता. पोलिसांची चाहूल लागताच त्याने आपले शहर वारंवार बदलले, ट्रॅक होऊ नये म्हणून अनेक वेळा मोबाईल नंबर देखील बदलले. तसेच आपली ओळख लपवण्यासाठी त्याने डोक्यावर टक्कल केले होते.

दुरांतो एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना सापळा –

आरोपी हा मुंबई ते नागपूर दुरांतो एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ यंत्रणा अलर्ट केली आणि बडनेरा रेल्वे स्थानकावर सापळा रचला. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ट्रेन येताच पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

आरोपीला जळगावात आणून पुढील तपास सुरू असून या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

जळगाव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!