महालक्ष्मी मंडळातर्फे भक्तांसाठी विशेष आयोजन; अल्पेश भाऊ देवरे यांचे उपस्थितीचे आवाहन

महाजन नगर, जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला व नागरिक आनंदाने सहभागी होत आहेत.

या उत्सवाचे आयोजन अल्पेश भाऊ देवरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. दांडियाच्या आनंदासोबतच भक्तांसाठी उद्या, खाटू श्याम बाबा दरबाराचे विशेष आयोजन महाजन नगर येथील ओपन पेजवर करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरातील भाविकांना भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.

कार्यक्रमात संजय देवरे, योगेश बनछोडे, राजेश बनछोडे, पवन राजपूत, लोकेश जंजाळकर, विवेक मराठे, दिपक राजपूत, सागर देवरे, मोंटी राजपूत रोहीत चौधरी, कल्पेश सोनार कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होत आहेत.

दांडियाचा उत्साह, भक्तीचा संगम आणि खाटू श्याम बाबांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी महाजन नगर व परिसरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अल्पेश भाऊ देवरे यांनी केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!