नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

नंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) ओबीसी मोर्चाच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी काकर्दे, ता. जि. नंदुरबार येथील कल्पेश माळी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र त्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देण्यासाठी तसेच ओबीसी समाजातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना व पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी पाडवी, जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, सत्यानंद गावित, कैलास चौधरी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. समिधा नटावदकर, कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश माळी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नियुक्तीबद्दल कल्पेश माळी यांचे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!