जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे समाजातील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी ‘एक तास साक्षरतेचा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत निरक्षर पालक व नागरिकांसाठी शाळेत दररोज एक तासाचा साक्षरता वर्ग घेण्यात येणार असून, त्यामध्ये अक्षरओळख, वाचन, लेखन, अंकज्ञान तसेच दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे मूलभूत ज्ञान देण्यात येणार आहे. गरजेनुसार डिजिटल साक्षरतेची प्राथमिक माहितीही देण्यात येणार आहे.

या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांनी अथवा आपल्या कुटुंबातील निरक्षर व्यक्तींनी शाळेत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले आहे.

“वय शिकण्याच्या आड येत नाही; प्रत्येक व्यक्ती साक्षर होणे हा समाजाचा सामूहिक संकल्प असला पाहिजे,” या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

शिक्षकवृंदाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून ‘घराघरात साक्षरता, समाजात प्रगती’ हा संदेश देण्यात येणार आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!