जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत सुरेश नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुणपत्रिका प्रदान करण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करण्यात आले तसेच आगामी शैक्षणिक वर्षात अधिक मेहनत घेऊन यश संपादन करण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्ष श्री. प्रशांत नाईक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणासोबतच संस्कार व व्यक्तिमत्त्व विकासालाही महत्त्व देण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणपत्रिका प्राप्त करताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील शिक्षकांनी केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!