मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
घनसांवगी मतदारसंघातील मौजे बोरगाव खुर्द ग्रामपंचायती अंतर्गत १५व्या वित्त आयोग आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (म.ग्रा.रो.ह.यो.) अंतर्गत झालेल्या कामांच्या कथित अनियमिततांविरोधात गावकऱ्यांनी जिल्हा परिषद जालना येथे आमरण उपोषण सुरू केले होते. ग्रामस्थांनी या कामांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.

काल आमदार हिकमत दादा उढाण यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील अनेक विकासकामांमध्ये अनियमितता आढळून आल्या असून, याची पारदर्शक चौकशी व्हावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. दादांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, त्यांच्या मागण्यांवर गंभीरपणे विचार होईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

उपोषणकर्त्यांनी दादांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले.

