मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडीरामसगाव घनसावंगी येथे शालेय समिती-सरपंच ग्रामस्थ यांच्यावतीने महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील शिक्षक रामेश्वर तिरमुखे यांचा आजच वाढदिवस असल्याने त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी पालक यांना महात्मा फुले यांचे चरित्रपर पुस्तके व पेन भेट देण्यात आले.

सरपंच दत्तात्रय वराडे, शाळा समीती अध्यक्ष भरत चांदगुडे, अनिरुध्द साबळे, राजेश सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक ए.बी. भागवत, लक्ष्मण बेवले, अशोक शिंदे, विजय खांडेभराड, श्रीम.प्रतिभा सातपुते, पल्लवी नाईक, श्रीम.स्वाती तोडकरी सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

