जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२६
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील
चोपडा, दि. ३० ऑक्टोबर २०२६
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ च्या निवडणुकीचे वेध लागले असून चोपडा तालुका विकास सोसायटी मतदार संघातून सौ. उज्ज्वला अतुल ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मंगरुळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असलेल्या सौ. उज्ज्वला अतुल ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत व शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात सादर केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

याप्रसंगी चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अतुल भिमराव ठाकरे, जळगाव जिल्हा पूर्व महिला अध्यक्ष संध्याताई महाजन, भाजपा महिला शहर अध्यक्ष वैशालीताई भावसार, अनु. जाती जमाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर, माजी जि.प. सदस्य गजेंद्रदादा सोनवणे, पणन महासंघ अध्यक्ष रोहितदादा निकम, भाजपा पूर्व तालुका अध्यक्ष पिंटूदादा पावरा, भाजपा अध्यक्ष पंकजदादा पाटील, खेडेभीकरी सरपंच रणछोडदादा पाटील, मंगरुळ विकास सोसायटी चेअरमन गुलाब मनोहर पाटील, माजी चेअरमन प्रकाश भिमराव ठाकरे, युवा मोर्चा पूर्व तालुका अध्यक्ष रावसाहेब पाटील, युवा मोर्चा उपजिल्हा अध्यक्ष विजय बाविस्कर, विलास पाटील, पांडुरंग नहायदे, ऍड. प्रणय अतुल ठाकरे, जिल्हा चिटणीस भाजपा युवा मोर्चा जळगाव पूर्व अमोल ठाकरे, विराज ठाकरे व धीरज पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
