राहुरी फॅक्टरी
राहुरी फॅक्टरीचे सुपुत्र विजयकुमार सेठी यांनी खरेदी केलेल्या स्व मालकीच्या हेलिकॉफ्टरमधून काल शुक्रवारी सकाळी अनाथ आश्रम शाळेतील बालकांना व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविली आहे.
उद्योजक विजयकुमार सेठी यांनी त्यांचे वडील पवनकुमार सेठी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुहा येथील गंगाधर बाबा छत्रालाय वरवंडी येथील गाडगे बाबा आश्रम शाळेतील अनाथ मुले तसेच जोगेश्वरी आखाडा येथील चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेतील गुणवंत व विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर सफर घडविली.

उद्योजक सेठी व कुटुंब यांचे हेलिकॉप्टर चिंचविहिरे शिवारात दाखल झाल्यानंतर अनाथ मुले व विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविली. यावेळी बालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. लहान वयात आमच्या मुलांना ही मोठी संधी विजयकुमार सेठी व परिवाराने दिल्याबद्दल शिक्षकांनी ऋण व्यक्त केले.
यावेळी संजय सेठी, बादल सेठी, कीर्ती सेठी, कॅप्टन पायल तलवार, पलक सेठी, विशाल सेठी तसेच उद्योजक ऋषभ लोढा, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, वर्धमान लोढा, नंदकुमार लोढा, प्रकाश सोनी, डॉ.संदीप मुसमाडे, दत्तात्रय साळुंके, रामेश्वर तोडमल, मारुती नालकर, नंदू मोरे, पप्पू सपकाळ, प्रवीण देशमुख, नानासाहेब गमे, गोपीनाथ वरपे, ज्योती वरपे, सैफ शेख, पंकज हारदे, रोहन म्हस्के, गणेश कदम, साई त्रिभुवन, प्रणय भोसले तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अग्निशामक विभागाचे कर्मचारी, होमगार्ड पथक उपस्थित होते.
