मैत्रिणीने गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं, तोंड दाबून हात पकडले आणि दोघांनी आळीपाळीने विकृतीचा कळस गाठला…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या किळसवाण्या कृत्यात पीडितेच्या १६ वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीने आरोपींना मदत केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आपल्या आईसोबत कामाच्या ठिकाणी गेली होती. अर्धवट काम झाल्यानंतर तिची आई पाणी भरण्यासाठी घरी गेली. याच संधीचा फायदा घेत पीडितेची १६ वर्षीय मैत्रीण तिथे आली.

तिने बहाणा करून पीडितेला महिलांच्या स्वच्छतागृहात नेले. त्या ठिकाणी आधीपासूनच राहुल आणि आर्या नावाचे दोन आरोपी दबा धरून बसले होते. पीडित मुलगी आत येताच आरोपी राहुलने तिच्यावर अत्याचार सुरू केला. पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या अल्पवयीन मैत्रिणीनेच तिचे तोंड दाबून तिचे हात पकडून ठेवल्याचा आरोप आहे.

त्यानंतर आरोपी आर्या यानेही पीडितेवर अत्याचार केला. दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्यानंतर पुन्हा एकदा राहुलने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपी आर्याने दिली. तसेच आपले नाव सांगितल्यास सोडणार नाही, अशी धमकी अल्पवयीन आरोपी मैत्रिणीनेही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(1), 70(2), 351(2), 49, 3(5) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम 4, 6, 8, 10, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी राहुल आणि आर्या या दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली आहे. तर अल्पवयीन आरोपी मुलीबाबत बाल न्याय मंडळासमोर कायद्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

या घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले हे करत असून त्यांना पोलीस निरीक्षक अमित मनेल आणि इतर अधिकारी व कर्मचारी सहकार्य करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!