विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

छत्रपती संभाजीनगर, मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य न करण्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल १ हजार ८६ शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी शुक्रवारी या आदेशावर स्वाक्षरी केली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना नोटिसा बजावून खुलासा मागवला होता. तसेच मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामपंचायतींचे ठराव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, शिक्षकांनी सादर केलेले खुलासे समाधानकारक नसल्याने शिक्षण विभागाने ते अमान्य केले आहेत.

या कारवाईत गंगापूर तालुक्यातील ७५३ आणि खुलताबाद तालुक्यातील ३३३ शिक्षकांचा समावेश आहे. एकाच वेळी हजाराहून अधिक शिक्षकांवर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!