जळगांव शहर प्रतिनिधी,

दुचाकी चोरीत माहिर चोरट्यांनी जळगावात उच्छाद मांडला आहे. शहरात दुचाकी चोरण्यासाठी चोरट्यानी चक्क चारचाकी गाडीतून येत दुचाकी चोरण्याचा पराक्रमच केला आहे. दुचाकीजवळ कारमधुन चोरटा उतरला आणि बुलेट घेऊन पसार झाला. चोरीची ही भन्नाट घटना मोहाडी रोड वरील नेहरुनगर परिसरात शुक्रवार, 31 रोजी मध्यरात्रीनंतर घडली. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

भरत वासुदेव बेंडाळे (53, रा. प्लॉट नं. 51, शोभा अपार्टमेंट,नेहरुनगर) याठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते कन्स्ट्रक्शन मटेरिअल पुरविण्याचा व्यवसाय करतात. शुक्रवारी ते त्यांच्या मित्राकडील हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. रात्री ते घरी आले तेव्हा घराजवळ त्यांच्या मालकीची रॉयल एनफिल्ड बुलेट (एम.एच.19 डी.आर.71111) ही लॉक करुन लावल्याची खात्री करुन ते घरात निघुन गेले. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ते मॉर्नंग वॉकसाठी अपार्टमेंटच्या खाली आले असता त्यांना त्यांची बुलेट दिसली नाही. परिसरात त्यांनी दुचाकीचा शोध घेतला मात्र बुलेटचा तपास लागला नाही. सुमारे 60 हजार किमतीची बुलेट चोरुन नेल्याची खात्री त्यांची झाली. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास किशोर पाटील हे करीत आहेत.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!